गणेशोत्सवात धावणार एसटीच्या तब्बल 2200 ज्यादा बसेस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

- प्रवाशांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने घेतला हा निर्णय.

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) खास तयारी केली जात आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटीकडून तब्बल 2200 ज्यादा बसेसची सोय केली जाणार आहे. त्यामुळे या सर्व सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले.

गणेशोत्सव हा कोकणच्या लोकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण. मुंबई आणि उपनगरातील कर्मचाऱ्यांना कोकणातील त्यांच्या घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने पुढाकार घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर तब्बल 2200 ज्यादा बसेसची सोय केली आहे. एसटीला वाढती मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने 2200 बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. 

28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत गणेश उत्सवाची पहिल्या टप्प्याची ज्यादा वाहतूक करण्यात येणार असून, येत्या 27 जुलैपासून संगणकीय आरक्षणासाठी या ज्यादा बसेस लावण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over 2200 ST buses to be run in Ganesh Festival