बापरे! राज्यात ऑक्‍सिजनचा वापर दोन महिन्यांत दुप्पट

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्‍सिजनचा वापर दोन महिन्यांत दुपटीने वाढला आहे. कोरोना रुग्णांमध्ये ऑक्‍सिजनची पातळी कमी होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या अन्न व औषध प्रशासन, तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजनचा अखंडित पुरवठ्यासाठी प्रयत्न करत आहेत.

मुंबई - राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्‍सिजनचा वापर दोन महिन्यांत दुपटीने वाढला आहे. कोरोना रुग्णांमध्ये ऑक्‍सिजनची पातळी कमी होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या अन्न व औषध प्रशासन, तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजनचा अखंडित पुरवठ्यासाठी प्रयत्न करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउनपूर्वी दिवसाला दररोज २०० ते ३०० टन ऑक्‍सिजनची गरज होती; परंतु आता कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशा रुग्णांना बाहेरून ऑक्‍सिजनचा पुरवठा केला जातो. ऑक्‍सिजनचा वापर कालपर्यंत (ता.९) दुपटीने म्हणजेच ८५० टन झाला आहे. १ जुलैपर्यंत हा वापर ४५० टन एवढा होता. ९ सप्टेंबरपर्यंत राज्यातील कोरोना रुग्णसंख्या दोन लाख चार हजारांवर पोचली आहे. ती १ जुलैपर्यंत केवळ ७९ हजार ७५ होती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑक्‍सिजनअभावी कोणत्याही रुग्णाला त्रास होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या पथकांकडून रुग्णालयांतील ऑक्‍सिजनची माहिती घेतली जात आहे. शहरी व ग्रामीण भागात ऑक्‍सिजनचा पुरेसा पुरवठा केला असल्याचा दावा माहिती अन्न व औषध प्रशासनाने केला आहे.

ऑक्‍सिजनचे प्रमाण सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही टप्प्याटप्प्याने उत्पादक कंपन्या वाढवत आहोत. उत्पादकांसह पुरवठादारही वाढविले आहेत. जिल्हा आणि विभागीय स्तरावर माहितीसाठी रुग्णालयांशी आणि आरोग्य विभागाशी संपर्क साधला जात आहे.
- अरुण उन्हाळे, आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oxygen consumption in the state doubled in two months