पॅकेजमुळे कारखानदारांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

भवानीनगर - केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी बुधवारी जाहीर केलेल्या ८ हजार ५०० कोटींच्या पॅकेजविषयी साखर उद्योगाने समाधान व्यक्त केले असले तरी, या संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. केंद्र सरकारच्या पॅकेजमुळे साखरेचा भाव प्रतिकिलो ३० ते ३२ रुपयांदरम्यान राहील. ऊस उत्पादक व कारखान्यांसाठीही हा निर्णय फायदेशीर ठरेल, अर्थात उसासाठी प्रतिटन ३२०० रुपये व साखरेसाठी २९०० रुपये हे गणित अडचणीचेच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या निर्णयाबद्दल साखर कारखाना पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया ः

केंद्राच्या निर्णयावर आम्ही पूर्णपणे समाधानी नाही. बऱ्याच विषयांना स्पर्श झालेला नाही. ‘थोडी खुशी, थोडा गम’ असे हे पॅकेज आहे. साखरेचा भाव २९ रुपये कशाच्या आधारावर केला, हे लक्षात येत नाही. एकीकडे उसाचा भाव ३२ रुपयांवर आणि उत्पादन खर्च ३५ रुपये असताना साखरेचा भाव २९ रुपये ठरवणे, हा संभ्रम आहे. निर्यातीच्या संदर्भात आम्ही जो प्रस्ताव दिला होता, त्यावर काहीच विचार झालेला नाही. मात्र, यासाठी आम्ही यापुढेही पाठपुरावा करू. 
- प्रकाश नाईनकवरे,  व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय साखर संघ 
 
केंद्र सरकारच्या पॅकेजच्या निर्णयामुळे साखर प्रतिक्विंटल ३ हजार ते ३२०० रुपयांपर्यंत पोचेल, असे दिसते. हा निर्णय जरा उशिरा झाला असला, तरी कारखानदारीला दिलासा देणारा ठरेल. एफआरपीसाठीही हा निर्णय मदतीचा ठरेल.
- ॲड. अशोक पवार, अध्यक्ष घोडगंगा कारखाना

साखर उद्योगाला अडचणीच्या काळात हा निर्णय काही प्रमाणात दिलासा देईल. मात्र, याला खूप उशीर झाला आहे. साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेला बफर स्टॉकचा निर्णय फायद्याचा ठरेल. तरीही काही विषय अद्याप तसेच राहिलेले आहेत, हेही नक्की.
- अमरसिंह घोलप, अध्यक्ष, छत्रपती सहकारी साखर कारखाना

साखरेच्या भावाबाबत कारखान्यांना मोठी आर्थिक अडचण आली होती. जागतिक स्तरावरही आजही साखर भावात घसरण आहे. केवळ पंतप्रधानांनी आयात शुल्काबाबत घेतलेल्या निर्णयामुळे साखरेचे भाव देशात स्थिर राहिले. आता हा पॅकेजचा निर्णय फायदेशीर ठरेल. ३० लाख टनाचा साखरेच्या बफर स्टॉकचाही फायदा होईल. कारखानदारीला अडचणीतून बाहेर पडण्यास मदत मिळेल. 
- रंजन तावरे,  अध्यक्ष, माळेगाव साखर कारखाना

Web Title: package provides to sugarfactory