मूल दत्तक घेतल्यास सहा महिने पगारी रजा 

तुषार देवरे
सोमवार, 17 एप्रिल 2017

देऊर - नोकरी करणाऱ्या काही दांपत्यांना दोन मुलांनंतर मुलीची अथवा दोन मुलीनंतर मुलगा हवा असतो, मात्र काही कारणांमुळे त्याची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. अशांना लाभकारक असा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शासकीय, निमशासकीय महिला कर्मचाऱ्यांना मूल दत्तक घेऊन आपली इच्छा पूर्ण करता येणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. 

शासनाने एक वर्षाच्या आतील अनाथ मूल दत्तक घेणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची (180 दिवसांची) विशेष रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, एक वर्षापेक्षा अधिक ते तीन वर्षे वयाचे मूल दत्तक घेतल्यास त्या तारखेपासून 90 दिवस रजा लागू राहील. 

राज्यातील सर्व कृषी व बिगरकृषी विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये तसेच शासकीय व अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संस्थांमधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महिला कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. याआधी अनाथालय किंवा अनाथाश्रमांमधून मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 90 दिवसांची विशेष रजा दिली जात होती. आता अनाथालयातून किंवा अनाथाश्रमांमधून मूल दत्तक घेणे आणि स्वतःचे मूल नसणे या दोन्ही अटी रद्द करण्यात आल्या आहे. दोनपेक्षा कमी अपत्य असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी मूल दत्तक घेतल्यास तिलाही विशेष रजेचा लाभ मिळणार आहे. मात्र, या महिला कर्मचाऱ्यांनी विशेष रजा घेतल्यावर नंतर प्रसूतिरजा अनुज्ञेय होणार नाही. 

सेवा कालावधीची अट नाही 
या विशेष रजेसाठी सेवा कालावधीची अट नाही. मात्र, ज्या महिला शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा दोन वर्षांपेक्षा कमी झाली आहे, अशा महिलांनी रजेसाठी अर्ज करताना कार्यालयास बंधपत्र द्यावे. या महिलांनी मूल दत्तक घेऊन विशेष रजेचा लाभ घेतल्यास त्यांना शासनाची दोन वर्षे सेवा करणे बंधनकारक राहणार आहे. 

Web Title: Paid leave for six months if the child is adopted