'पालघरमधील विमाननिर्मिती सरकारच्या मदतीनेच'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 एप्रिल 2017

मुंबई - राज्यात पालघर येथे विमाननिर्मिती प्रकल्पासाठी राज्य सरकार कॅप्टन अमोल यादव यांच्या कंपनीबरोबर सहकार्य करण्यास तयार आहे. या प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारच्या नागरी विमान महासंचालनालयाने प्रक्रिया सुरू करावी, यासाठी राज्य सरकार पाठपुरावा करील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली. 

कॅप्टन अमोल यादव हे ट्रस्ट एअरक्राफ्ट प्रा. लि.द्वारे पालघर येथे विमाननिर्मिती प्रकल्प उभारणार आहेत. यासाठी राज्य सरकारकडे त्यांनी मदत मागितली आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. राज्यात 19 आसनी नागरी वाहतूक विमानांची निर्मिती करण्याचा यादव यांचा प्रकल्प आहे. यामुळे अंतर्गत विमान वाहतुकीला चालना मिळेल. हा प्रकल्प राज्य सरकारच्या औद्योगिक विकास 

महामंडळासोबत भागीदारीतून करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असल्यामुळे प्रकल्पाच्या प्रमाणीकरणाची कार्यपद्धती नागरी वाहतूक महासंचालनालयाने तयार करून या प्रकल्पास मंजुरी द्यावी, यासाठी पंतप्रधान कार्यालयास पत्र पाठवून पाठपुरावा करण्यात येईल. या प्रकल्पासाठी जमीन देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. 

तीस विमानतळ जोडले जाणार 

लहान विमानांमुळे राज्यातील 30 विमानतळांवरून वाहतूक सुरू करता येईल. यासाठी सध्या असलेल्या कुठल्याही विमानतळावर अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Palghar aircraft in the formation of the government's help