टोकन दर्शन व्यवस्था तूर्त लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पंढरपूर - विठ्ठल दर्शनाची रांग कमी करण्याच्या हेतूने टोकनद्वारे दर्शन व्यवस्था सुरू करणे सध्यातरी अशक्‍य असल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकारांना सांगितले.  

ते म्हणाले, टोकन दर्शन व्यवस्थेसाठी मंदिरात व दर्शन मंडपात पायाभूत सोयीसुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. याशिवाय गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडच्या जागी मोठा दर्शन मंडप उभारावा लागणार आहे. अपूर्ण स्कायवॉकचेही काम पूर्ण करावे लागणार आहे. मूलभूत सोयी तयार झाल्यानंतरच टोकन दर्शन व्यवस्था सुरू करणे शक्‍य होईल.

दरम्यान, मंदिर समितीने बांधलेल्या सुमारे ७५ कोटी रुपयांच्या भक्तनिवासाचे उद्‌घाटन १७ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने मंदिर समितीने तयारी सुरू केली आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच मंदिर समितीने वारकरी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधून त्याकडून मंदिरासंदर्भातील अडीअडचणी जाणून घेतील, असेही डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.

Web Title: Pandharpur Darshan Tokan