श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात 40 लाखांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

पावतीद्वारे एक कोटी 40 लाखांची देणगी

पावतीद्वारे एक कोटी 40 लाखांची देणगी
पंढरपूर - आषाढी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात यंदा 39 लाख 55 हजार 508 रुपयांची वाढ झाली आहे. प्रामुख्याने देणगी पावत्यांच्या माध्यमातून उत्पन्नवाढ झाली आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली आणि व्यवस्थापक विलास महाजन यांनी दिली.

आषाढी यात्रेच्या 24 जून ते 9 जुलै या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने देणगी गोळा करण्यासाठी आणि देणगीदारांना रीतसर पावती देण्यास जादा स्वयंसेवकांची व्यवस्था केली होती. त्यामुळे यंदा वाढ होऊन दोन कोटी 68 लाख 96 हजार 514 रुपयांचे उत्पन्न मिळाले.
विविध प्रमुख माध्यमातून यंदा मिळालेले उत्पन्न (रुपयांत)
श्री विठ्ठलाच्या चरणी जमा झालेली रक्कम - 42,51,589
श्री रुक्‍मिणी मातेच्या चरणी जमा झालेली रक्कम - 7,65,883
पावतीद्वारे जमा झालेली देणगी - 1,39,53,102
बुंदी लाडू प्रसाद विक्री - 33,5,120
राजगिरा लाडू विक्री - 6,50,300
फोटो विक्री - 91,200
महानैवेद्य मुदतठेव जमा - 75,000
मनिऑर्डर - 39,617
साडी विक्री - 68,650
नित्यपूजा - 25,000
या शिवाय भक्त निवास, अन्नछत्र कायम ठेव, गो-शाळा देणगी, हुंडी पेटी, ऑनलाइन देणगी, विठ्ठल विधी उपचार या माध्यमातून समितीला मिळणाऱ्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.

Web Title: pandharpur maharashtra news vittal rukmini temple committee income increase