केंद्र सरकारने आरक्षणाबाबत कायदा करण्याची गरज: रामदास आठवले

ramdas athavale
ramdas athavale

पंढरपूर ः मराठा, पटेल, जाट, राजपूत, ब्राम्हण, लिंगायत यांना आरक्षण देण्यासाठी संविधानामध्ये दुरुस्ती करुन पंचवीस टक्के आरक्षण वाढवून ते पंच्याहत्तर टक्के करावे अशी मागणी आपण केलेली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने कायदा करण्याची गरज आहे. उच्च न्यायालयाने मागासवर्गीय, दलित आदिवासी, ओबीसी यांचे प्रमोशन मधील आरक्षण देऊ नये असा निर्णय घेतला असला तरी केंद्र सरकार आरक्षण देण्याच्या बाजूचे असून केंद्र सरकार त्या विषयी लवकरच घेणार असून कोणालाही अडचण येणार नाही, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (शुक्रवार) येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

श्री. आठवले म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने मागासवर्गीय, दलित आदिवासी, ओबीसी यांचे प्रमोशन मधील आरक्षण आहे ते देऊ नये असा निर्णय घेतलेला असला तरी राज्य सरकारने मात्र त्या निर्णयाला स्थगिती घेतलेली आहे. कोणत्याही प्रमोशन मिळालेल्या व्यक्तीला अडचण होणार नाही अशी राज्य सरकारची भूमिका आहे. केंद्र सरकार देखील प्रमोशन मध्ये दलित आदिवासी, ओबीसींना आरक्षण देण्याच्या बाजूचे आहे. त्यामुळे लवकरच केंद्र सरकार या संदर्भातील आवश्‍यक दुरुस्ती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संविधान बदलले जाणार असल्याचा खोडसाळ प्रचार काही मंडळींकडून केला जात आहे परंतु त्यामध्ये अजिबात तथ्य नाही. आपण केंद्रात मंत्री असे पर्यंत संविधानात कदापीही बदल होऊ देणार नाही असे त्यांनी आवर्जुन नमूद केले.

श्री. आठवले म्हणाले, सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी आम्ही पूर्वीच केलेली आहे. विद्यापीठाच्या समितीला तो अधिकार आहे. त्यांनी जरी वेगळी भूमिका घेतली असली तरी या मागणी विषयी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटून पाठपुरावा करणार असल्याचे श्री.आठवले यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

राणे यांनी लवकर भाजपा मध्ये जावे
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपा मधील प्रवेश फायद्याचा होणार की तोट्याचा या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री.आठवले म्हणाले, श्री. राणे यांना भाजपा मध्ये प्रवेश करणे फायद्याचे होणार आहे. कॉंग्रेसला काही लवकर सत्ता मिळणार नाही त्यामुळे कॉंग्रेस मध्ये राहणे त्यांना तोट्याचे होणार आहे. ते जो विचार करत आहेत तो चांगला आहे. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन भाजपा मध्ये प्रवेश करावा. 2019 आणि 2024 च्या निवडणूकीची चिंता आम्हाला अजिबात नाही. मोदी जो पर्यंत स्ट्रॉंग आहेत आणि राहुल गांधी वीक आहेत तो पर्यंत आम्हाला चिंता अजिबात नाही असे श्री.आठवले यांनी स्पष्ट केले.

सरकारला धोका नाही
राज्यात शिवसेना, भाजपा आणि महायुतीचे सरकार आहे. या सरकारला अजिबात धोका नाही. देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री राहणारच आहेत. शिवसेना पाठींबा काढेल असे वाटत नाही. तशी वेळ आली तर आपण शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना विनंती करु. तथापी त्यांनी पाठींबा काढला तर भाजपा सोबत 130 आमदार आहेत. सरकार वाचवण्यासाठी 15 आमदारांची आवशक्ता भासेल. सर्व पक्षातील आमदार माझे मित्र आहेत. त्यामुळे सरकार पडण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास 15-20 आमदारांची जबाबदारी मी निश्‍चित घेईन, असे श्री. आठवले यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com