'बडे नेते, संचालकांनी थकबाकी भरावी'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

पंढरपूर - शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या बड्या नेत्यांनी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकांनी त्यांची थकबाकी वेळेवर भरली तरी गरीब व गरजू शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यास मदत होईल. सहकारातील बड्या नेत्यांनी किमान अशा वेळी तरी आपली कर्जे भरून शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दाखवण्याची गरज आहे, असा उपरोधिक टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी जिल्ह्यातील राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या नेत्यांना लगावला. 

देशमुख म्हणाले, ""मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. यामध्ये आणखी काही सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना सर्वच बॅंकांना दिल्या आहेत. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांच्या कर्जवाटपास सुरवात झाली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनाही कर्जवाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.'' 

""सोलापूरसह राज्यातील 14 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका आर्थिक अडचणीत आहेत. या बॅंकांच्या संचालकांसह बड्या नेत्यांकडेच कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. या नेत्यांनी त्यांची थकबाकीची रक्कम भरली तरी अजूनही जिल्हा बॅंकांना नव्याने गरीब व गरजू शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणे शक्‍य आहे. अजूनही यापैकी ज्या बॅंकांची शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याची इच्छा असेल, त्या बॅंकांना शिखर बॅंकेकडून कर्जपुरवठा करण्यासंबंधी मदत केली जाईल; परंतु बॅंकेत पैसे असूनही शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांवर मात्र कठोर कारवाई केली जाईल,'' असे देशमुख यांनी सांगितले. 

थकबाकीदार संचालकांची नावे प्रसिद्ध करावीत 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अनेक संचालक व बड्या नेत्यांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. या थकबाकीदारांमुळेच गरीब शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. दहा लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकवणाऱ्या बॅंकेच्या संचालक व बड्या नेत्यांची नावे बॅंकांनी नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करावीत, असे थेट आवाहन सहकारमंत्री देशमुख यांनी बॅंकांना केले आहे. 

Web Title: pandharpur news farmer subhash deshmukh