महाराष्ट्र बॅंकेचे 70 लाख लुटले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

पंढरपूर - महाराष्ट्र बॅंकेच्या सांगोला शाखेतील 70 लाख रुपये बॅंकेचे शाखाधिकारी पंढरपूरकडे गाडीतून घेऊन येत असताना चार चोरट्यांनी गाडी अडवून रक्कम पळवून नेली. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास सांगोला-पंढरपूर रस्त्यावर खर्डी गावाजवळ घडली.

सांगोला येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी अमोल अप्पा भोसले (वय 30 रा. कोथाळे ता. माळशिरस हल्ली, रा. दत्त नगर, सांगोला) हे त्यांच्या शाखेतील जादा झालेली रक्कम पंढरपूर शाखेत जमा करतात. सांगोला शाखेतील सत्तर लाख रुपये आज बॅंकेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास आणि दहा रुपयांच्या नोटा मोजून झाल्यानंतर एका सुटकेसमध्ये भरल्या. त्यानंतर बॅंकेतील कर्मचारी नागनाथ शिखरे हे बॅग घेऊन आय 20 गाडीत (क्रमांक एमएच 45 एन 5831) बसले. भोसले गाडी चालवत पंढरपूरकडे येत होते. त्यांची गाडी पंढरपूर तालुक्‍यातील खर्डी गावाजवळ आलेली असताना मागून एक बोलेरो आली. ओव्हरटेक करून ती गाडी भोसले यांच्या गाडीपुढे थांबली. त्यातून तीस ते पस्तीस वयोगटातील चार जण खाली उतरले. मध्यम बांध्याचा चारपैकी एक भोसले यांना ओळखीचा वाटला. त्यांनी भोसले यांच्या गाडीची काच लाकडी दांडक्‍याने फोडून भोसले व शिखरे यांच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकली आणि गाडीतील 70 लाख रुपये असलेली सुटकेस घेऊन चौघे जण पुन्हा बोलेरोतून खर्डीच्या दिशेने पसार झाले.

Web Title: pandharpur news maharashtra bank 70 lakh loot