पंढरपूर परिसराला पावसाने झोडपले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

पंढरपूर - दोन महिने दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी दुपारी पंढरपूर शहर व परिसराला झोडपून काढले. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच मेघगर्जनेसह सर्वत्र जोरदार पाऊस झाला. आज झालेला पाऊस रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे.

आज दुपारी मेघगर्जनेसह सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी-पाणी झाले. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.

शहरातील रस्त्यांवरील खड्डे पाण्याने भरल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. येथील पुणे रोड व कराड रोडवरील रेल्वेच्या दोन्ही पुलाखाली पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांची मोठी कसरत करावी लागली. तालुक्‍यातील उपरी, गादेगाव, वाखरी, भंडीशेगाव या परिसरातही आज दुपारी जोरदार पाऊस झाला.

Web Title: pandharpur news rain