पंढरपूरः श्री विठ्ठलाच्या दर्शन व्यवस्थेसाठी महत्वपूर्ण विषयांना मंजुरी

अभय जोशी
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

पंढरपूर: श्री विठ्ठलाच्या दर्शन व्यवस्थेसाठी तिरुपती व तुळजापूरच्या धर्तीवर टोकन पद्धत कार्तिकी यात्रे पर्यंत कार्यान्वित करणे, शासनाचे उपजिल्हा रुग्णालय चालवण्यास घेण्याचा प्रस्ताव देणे, दर्शनाच्या उड्डाणपूलासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन ते काम वेगाने पूर्ण करुन घेणे या महत्वपूर्ण विषयांना श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या आजच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

पंढरपूर: श्री विठ्ठलाच्या दर्शन व्यवस्थेसाठी तिरुपती व तुळजापूरच्या धर्तीवर टोकन पद्धत कार्तिकी यात्रे पर्यंत कार्यान्वित करणे, शासनाचे उपजिल्हा रुग्णालय चालवण्यास घेण्याचा प्रस्ताव देणे, दर्शनाच्या उड्डाणपूलासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन ते काम वेगाने पूर्ण करुन घेणे या महत्वपूर्ण विषयांना श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या आजच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीची बैठक आज समितीचे अध्यक्ष श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर श्री. भोसले यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी गहिनीनाथ महाराज औसेकर, संभाजी शिंदे, सचिन अधटराव, डॉ. दिनेश कदम, शकुंतला नडगिरे, नगराध्यक्षा साधना भोसले हे सदस्य उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तासन्‌तास रांगेत उभे रहावे लागू नये यासाठी तिरुपती प्रमाणे टोकन (ऍक्‍सेस कार्ड) देण्याची व्यवस्था सुरु करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी तयार केला आहे. मंदिरा लगतचे संत तुकाराम भवन, दर्शन मंडप, बस स्थानक, रेल्वे स्थानक, विविध ठिकाणचे वाहनतळ आदीसह प्रमुख मठांच्या ठिकाणी टोकन देण्याची काऊंटर सुरु करण्याचीही योजना आहे. केंद्र शासनाच्या योजनेच्या माध्यमातून ही सुरु केली जाणार असल्याने समितीला त्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. भाविकाकडून देखील त्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. टोकन पध्दतीचे सादरीकरण केंद्र शासनाने नेमलेल्या त्रिलोक सिक्‍युरिटीज सिस्टीम प्रा.लि. यांच्या अधिकाऱ्यांनी आज समितीच्या बैठकीत केले.

कोट्यावधी भाविक ज्या श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येतात ते मंदिर आणि परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट बारा महिने स्वच्छ असलेच पाहिजे. त्यासाठी स्वच्छतेचे काम खासगी एजन्सी नेमून करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालय मंदिर समितीच्या माध्यमातून चालवण्याची आमची तयारी आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या विषय पत्रिकेवर 35 विषय होते. त्यासर्वांना मंजूरी देण्यात आली असे श्री.भोसले यांनी सांगितले.

टोकन पध्दतीमुळे उलाढाल वाढणार
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्रा काळात 25 ते 30 तास आणि ऐरवी दोन ते चार तास रांगेत थांबावे लागते. टोकन पध्दती सुरु झाल्यानंतर टोकन वर नमूद केलेल्या वेळी भाविकांना मंदिरात जाऊन झटपट दर्शन घेता येईल. भाविक रांगेत तिष्ठत बसण्याऐवजी मग बाजारपेठेत खरेदी करतील. विविध मठ व मंदिरांना भेटी देतील. त्याचा फायदा बाजारपेठेतील उलाढाल वाढण्यास होईल अशी अपेक्षा आहे.

आमदार राम कदम यांची दुसऱ्यांदा दांडी
मंदिर समिती स्थापन झाल्यानंतर झालेल्या समितीच्या पहिल्या बैठकीला समितीचे सदस्य आमदार राम कदम यांनी दांडी मारली होती. त्यानंतर आज झालेल्या समितीच्या दुसऱ्या बैठकीस तरी श्री. कदम हे मुंबई वरुन येतील अशी अपेक्षा होती परंतु त्यांनी आजही बैठकीस दांडी मारली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पाकसोबत मैत्री केल्यास काश्‍मीरमध्ये शांतता नांदेल - अब्दुल्ला
महिलेच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान
गिरीश महाजनांचा ठेका अन्‌ पोलिस निरीक्षकाची दौलतजादा ! 
माझ्यावर आरोप करण्यात काहींना आनंद वाटतो - खडसे
गुजरात सरकारची 'ब्लू व्हेल'वर बंदी
जुहू येथील इमारतीला आग; पाच जणांचा मृत्यू
ठाणे: कळव्यात महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या
जनसागर लोटला
दोन्ही देशांचे हित एकातच : नरेंद्र मोदी
गणेश विसर्जनादरम्यान राज्यात 16 जणांचा मृत्यू
ब्रॅण्डबाजा! (ढिंग टांग!)

Web Title: pandharpur news shree vitthal rukmini mandir darshan