विठ्ठलाचे तत्काळ दर्शनही सशुल्क? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

पंढरपूर - तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी पाठोपाठ आता पंढरपुरातही श्री विठ्ठलाच्या झटपट दर्शनासाठी शंभर रुपये देणगीशुल्क आकारणी सुरू होण्याचे संकेत आहेत. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने फेब्रुवारी महिन्यातच या संदर्भातील ठराव मंजूर केला आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या मंदिर समितीची पहिली बैठक 21 जुलै (शुक्रवार) रोजी होणार असून या बैठकीत शंभर रुपये शुल्क आकारणीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची भूमिका घेतली जाते का विरोध होतो, या विषयी उत्सुकता आहे. 

या संदर्भात पंढरपूर येथील समितीकडे चौकशी केली असता रणजितकुमार हे जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे सभापती असताना फेब्रुवारी महिन्यातच ऑनलाइन आणि तातडीच्या दर्शनासाठी शंभर रुपये शुल्क आकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मिळाली. श्री विठ्ठलाच्या तातडीच्या दर्शनासाठी शंभर रुपये देणगी निधी घेण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी त्या वेळचे जिल्हाधिकारी वेणुगोपाल रेड्डी यांनी देखील घेतला होता. परंतु त्या वेळी गरीब-श्रीमंत असा भेदभाव करू नका अशी भूमिका काही मंडळींनी घेतल्याने तो निर्णय रद्द करण्यात आला होता. 

या पार्श्‍वभूमीवर आता पुन्हा तातडीच्या दर्शनासाठी शंभर रुपये शुल्क स्वीकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. दरवर्षी सुमारे अडीच लाख भाविक ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन घेतात. सध्या ऑनलाइन बुकिंगसाठी शुल्क नाही. व्हीआयपी दर्शनातूनही समितीला कोणतेही उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे ऑनलाइन बुकिंगसाठी आणि ऐनवेळी आलेल्या गडबड असलेल्या भाविकांना झटपट दर्शन देण्यासाठी शंभर रुपये देणगी शुल्क आकारण्याचा ठराव फेब्रुवारीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. वार्षिक सुमारे अडीच कोटी रुपये या माध्यमातून समितीला मिळतील, असा मंदिर समितीचा अंदाज आहे. 

Web Title: pandharpur news vitthal darshan

टॅग्स