पंढरपुरात पोलिसांसाठी हॉलिडे होम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पंढरपूर - श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी सहकुटुंब आलेल्या पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राहण्यासाठी हक्काचे ठिकाण असावे, यासाठी येथील पोलिस संकुलाच्या इमारतीवर हॉलिडे होमच्या नवीन सुसज्ज दहा खोल्या (ए.सी.) बांधण्यात आल्या आहेत. पोलिस कल्याण निधीतून त्यासाठी सुमारे 80 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यात्रा काळ वगळता महाराष्ट्रातील कुठल्याही पोलिस कर्मचाऱ्यांना या हॉलिडे होममध्ये राहाता येणार आहे. येत्या पंधरा दिवसांच्या आत हे हॉलिडे होम पोलिसांना वापरण्यासाठी खुले करण्यात येणार असून, आषाढी यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे अधिकृत उद्‌घाटन केले जाण्याची शक्‍यता आहे.
Web Title: pandharpur police holiday home