esakal | Video : दुमदुमणारी पंढरी यंदा शांतच
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur

संचारबंदीमुळे सुनसान रस्ते... चंद्रभागा तीरावर शुकशुकाट... पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त... पूर्णतः बंद बाजारपेठ... विश्‍वास बसणार नाही, पण हे वातावरण आहे पंढरीतील आषाढी एकादशी दिवशीचे. या पर्वकाळात दरवर्षी सुरू असणारा हरिनामाचा गजर आज कोठेच ऐकू आला नाही. आज अधिराज्य होते ते नीरव शांततेचे आणि कोरोनाच्या दहशतीचे...!

Video : दुमदुमणारी पंढरी यंदा शांतच

sakal_logo
By
शंकर टेमघरे/ विलास काटे

पंढरपूर - संचारबंदीमुळे सुनसान रस्ते... चंद्रभागा तीरावर शुकशुकाट... पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त... पूर्णतः बंद बाजारपेठ... विश्‍वास बसणार नाही, पण हे वातावरण आहे पंढरीतील आषाढी एकादशी दिवशीचे. या पर्वकाळात दरवर्षी सुरू असणारा हरिनामाचा गजर आज कोठेच ऐकू आला नाही. आज अधिराज्य होते ते नीरव शांततेचे आणि कोरोनाच्या दहशतीचे...! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंढरपूरमध्ये मंगळवारपासून तीन दिवस संचारबंदी लागू आहे. प्रदक्षिणा मार्ग पूूर्ण बंद होता. घाटावर शुकशुकाट होता. ज्या मंदिरांमध्ये पादुका आल्या होत्या, तेथे नैमित्यिक धार्मिक कार्यक्रम सुरू होते. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांसह अन्य संतांच्या पादुकांना सकाळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत चंद्रभागा स्नान घालण्यात आले. माउलींच्या पादुकांना राजाभाऊ आरफळकर यांनी स्नान घातले.

महाराष्ट्रातील या शहराची लंडन, टोकियोपेक्षा हवा आहे शुद्ध

...तर भेटीला पादुका नेणार नाही 
सरकारच्या वतीने द्वादशीपर्यंत (गुरुवारी) पादुका सोहळ्यांना परवानगी देण्यात आली होती. तसेच द्वादशीला विठ्ठल भेटीसाठी पाच वारकऱ्यांसमवेत पादुका आणण्यास सांगितले आहे. मात्र, पादुकांसमवेत आलेल्या वीस वारकऱ्यांना विठ्ठल भेटीसाठी परवानगी न दिल्यास पादुका मंदिरात न नेता पुन्हा परतीचा प्रवास सुरू करणार असल्याचा इशारा सर्व संस्थानच्या प्रमुखांनी दिला आहे. 

मध्य महाराष्ट्रात पाऊस जोर धरणार

दोन सोहळ्यांना ‘तिकीट’ 
प्रमुख संतांच्या पादुका थेट पंढरपूरला नेण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली होती. त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत चांगावटेश्वर यांच्या पालखी सोहळ्यांना पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एसटी बस पाठविली. पैठणला औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तर रुक्‍मिणी पालखीसाठी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एसटी दिली. परंतु निवृत्तिनाथ संस्थानकडून नाशिक एसटी डेपोने ७१ हजार रुपये घेतले तर मुक्ताई पादुका ८६ हजार रुपये देऊन खासगी बसने वाखरीत आणल्या. त्यामुळे निवृत्तिनाथ संस्थानचे संजयनाना धोंडगे व मुक्ताई संस्थानचे रवींद्र महाराज हरणे यांनी नाराजी व्यक्त केली.