पंकज भुजबळांच्या 'मातोश्री' भेटीमुळे चर्चेला उधाण 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 मे 2018

मुंबई - महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी जामीन मिळालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यांनी बुधवारी "मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उभयतांमध्ये सुमारे 15 मिनिटे चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात दिवसभर विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. ही केवळ सदिच्छा भेट होती.

मुंबई - महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी जामीन मिळालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यांनी बुधवारी "मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उभयतांमध्ये सुमारे 15 मिनिटे चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात दिवसभर विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. ही केवळ सदिच्छा भेट होती. छगन भुजबळांना जामीन मिळाल्याने पेढे देण्यासाठी पंकज "मातोश्री'वर गेले, असा दावा त्यांच्या निकटवर्तीयांनी केला; मात्र नाशिक विधान परिषद मतदारसंघात निवडणूक होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

नाशिकमध्ये भाजपशी युती न करता शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने तेथे भुजबळ यांचे प्रतिस्पर्धी, यापूर्वी शिवसेनेचे उमेदवार असलेले ऍड. शिवाजी सहाणे यांना रिंगणात उतरवले आहे. सहाणे उमेदवारी अर्ज सादर करत असताना भाजप आमदार अपूर्व हिरे उपस्थित होते. त्यामुळे या निवडणुकीत सर्वच पक्ष विरोधकांची मते फोडण्याची जोरदार खेळी करू शकतात, अशी शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर ही भेट झाली. 

Web Title: Pankaj Bhujbal Meets Shiv Sena Chief Uddhav Thackeray