पंकजा मुंडेंचा पक्षाला निरोप; नाराजी उघड?

टीम ई सकाळ
Tuesday, 10 December 2019

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आजच्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे पाठ फिरवली असून त्यांनी आज बैठकीला येणार नसल्याचा निरोप पक्षाला दिला आहे. गोपीनाथ गडावरच्या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्थ असल्याचं कारण त्यांनी आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांना दिले आहे.

मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आजच्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे पाठ फिरवली असून त्यांनी आज बैठकीला येणार नसल्याचा निरोप पक्षाला दिला आहे. गोपीनाथ गडावरच्या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्थ असल्याचं कारण त्यांनी आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांना दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍ

विभागवार बैठकीनंतर आज कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी मारल्याने पंकजा मुंडे यांनी नाराजीचे स्पष्ट दिसत असून याविषयी राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी लिहलेल्या फेसबुक पोस्टपासून त्या पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यातच त्यांनी पक्षातील दुसरे नाराज नेते एकनाथ खडसे यांचीही भेट घेतली आहे.

भाजपसोबत गेलेल्या नेत्याचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक; चर्चांना उधाण

एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडणार नसले तरी पक्षात ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याची भावना वारंवार बोलून दाखवली आहे. त्यातच पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यापासून त्या अस्वस्थ असल्याचे बोलले जात असतानाच त्यांनी आज पक्षाच्या बैठकीला मारलेल्या दांडीमुळे त्यांची नाराजी स्पष्ट दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. तसेच, पंकजा याच्या सर्थकांकडूनही सोशल मीडियावर नाराजीची उघड उघड चर्चा सध्या सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde absent BJPs core committee meeting