पंकजा मुंडेंना क्‍लीन चिट; विरोधकांचे टीकास्त्र

पीटीआय
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

मुंबई - चिक्की गैरव्यवहार प्रकरणात महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. कथित चिक्की गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंकजा मुंडे यांना क्‍लीन चिट देताना यासंदर्भातील फाइलदेखील बंद केली आहे. तसा अहवालदेखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) गृह विभागाला पाठवण्यात आला आहे.

शालेय मुलांसाठी पोषण आहार (चिक्की) आणि इतर वस्तूंसाठी नियमबाह्य पद्धतीने 206 कोटी रुपयांचे कंत्राट दिल्याचा आरोप पंकजा यांच्यावर करण्यात आला होता. एसीबीने हे प्रकरण बंद केले आहे. त्यांच्याविरोधात करण्यात आलेला आरोप सिद्ध होऊ शकला नसल्याचे एसीबीच्या एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

क्‍लीन चिट मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. माझी बदनामी करून, राजीनामा मागण्याची सुपारी घेणाऱ्यांनी कितीही कागद नाचवले, तरी त्यात काही तथ्य नाही, हे आज सिद्ध झाले आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, पंकजा यांना क्‍लीन चीट मिळाल्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्यातील फडणवीस सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे "क्‍लीन-चिटर' सरकार असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सरकारच्या ताटाखालचे मांजर झाला आहे. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करायचीच नसेल, तर एसीबीला टाळे लावा, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

मुंडे यांना क्‍लीन चिट दिल्याच्या मुद्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनीदेखील सरकारवर टीकास्त्र सोडले. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याची परंपरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम ठेवल्याचे नवाब मलिक म्हणाले.

Web Title: pankaja munde got clean chit