पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 December 2019

मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दौरा शिवनेरीवर होणार आहे. शिवनेरी नंतर ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेल्या एकविरा देवीच्या दर्शन घेऊन मुख्यमंत्री थेट गोपीनाथगडावर जाणार आहेत. ठाकरे यांच्या गोपीनाथ गडावरील उपस्थितीमुळे राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून यानिमित्ताने पंकजा मुंडेचा शिवसेना प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

पुणे : मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दौरा शिवनेरीवर होणार आहे. शिवनेरी नंतर ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेल्या एकविरा देवीच्या दर्शन घेऊन मुख्यमंत्री थेट गोपीनाथगडावर जाणार आहेत. ठाकरे यांच्या गोपीनाथ गडावरील उपस्थितीमुळे राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून यानिमित्ताने पंकजा मुंडेचा शिवसेना प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक 

भाजपनेत्या पंकजा मुंडे या सध्या पक्षात नाराज असल्याचे बोलले जात आहे. उद्या (ता.१२) गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमात त्या काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्या नाराज असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या कोअर कमिट्यांच्या बैठकांना त्याची गैरहजेरी नाराजीच्या चर्चांना खतपाणी घालत आहेत. दरम्यान भाजपचे बहुजन चेहेरा असलेले दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन गोपीनाथ गडावर गुरुवारी( ता.12) होत आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे सहकुटूंब जाणाऱ असल्याची माहिती आहे. यामध्ये रश्मी ठाकरे, आमदार आदित्य आणि तेजस ठाकरे असणार आहेत.

गोपीनाथ गडावरील बॅनरवर ना कमळ ना भाजपनेते 

Image may contain: 1 person, smiling

ठाकरे आणि मुंडे परिवाराचे ऋणानुबंध जगजाहीर आहेत. या परिवारातील स्नेहाचा ओलावा गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरही कायम आहे. या स्नेहाच्या संबधांमुळे उद्धव ठाकरे सहकुटुंब गोपीनाथ गडावर जाणार असल्याची खात्रीशीर माहिती `सकाळला मिळाली आहे.

भाजपनेत्यांना मोठा धक्का; महाविकास आघाडी घेणार मोठा निर्णय

दरम्यान खासदार प्रितम मुंडे यांनी बुधवारी (ता.10)  गोपीनाथ गडावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती मध्ये "उद्या तुम्हीच पहा काय होईल ते" असे म्हणत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde may Enters in Shivsena tomorrow in Presence of Uddhav thackeray