गोपीनाथ गडावरील बॅनरवर ना कमळ, ना भाजपनेते; चर्चांना उधाण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 December 2019

गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती दिनाचा पंकजा मुंडे यांनी स्वाभीमान दिन असा उल्लेख केला आहे. पराभवानंतर दोन महिन्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात त्या सहभागी होत संवाद साधणार आहेत. मात्र, या निमित्त लागलेल्या व सोशल मिडीयात व्हायरल होत असलेल्या बॅनरवर कुठेही भाजप नेत्यांचा फोटो वा पक्षाचे चिन्ह दिसत नाही. त्यातच मागच्या दोन दिवसांत मुंबई व औरंगाबाद येथे झालेल्या पक्षाच्या बैठकांनाही पंकजा मुंडेंची गैरहजेरी होती.

बीड : गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती दिनाला पंकजा मुंडे यांनी ‘स्वाभिमान दिवस’ आपण सर्व या असे आवाहन केले आहे. परंतु, या निमित्त सोशल मिडीयाव व्हायरल होत असलेल्या पोस्ट आणि लागलेल्या बॅनरवर कुठेही पक्षाचे चिन्ह वा बड्या नेत्यांचे फोटो नसल्याने पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. त्यातच त्यांनी मागचे दोन दिवस मुंबई व औरंगाबादच्या पक्षाच्या बैठकांकडे पाठ फिरविल्याने तर्क - वितर्कांना उधाण आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

गुरुवारी (ता. १२) परळीजवळील गोपीनाथगडावर गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचा कार्यक्रम होत आहे. दहा दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन करणारी पोस्ट टाकली. पोस्टमधील काही शब्द व वाक्यांवरुन तर्क वितर्क सुरु झाले. परंतु, आपण भाजपाशी एकनिष्ठ असल्याचे नंतर त्यांनी जाहीर केले. परंतु, पुन्हा समर्थकांच्या सोशल मिडीयावरील ‘आमच ठरलय’ जयमहाराष्ट’ अशा पोस्ट आणि पंकजा मुंडे यांची पक्षाच्या बैठकांना पाठ यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आले आहे. मुंडे समर्थकांचे स्फुर्तीस्थान असलेल्या गोपीनाथगडावरील गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीला मागच्या काळात भाजपच्या दिग्गजांनी हजेरी लावली.

विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक

उद्या होत असलेल्या जयंती कार्यक्रमांना कोण येणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. येकीकडे पंकजा मुंडेंनी ‘हा स्वाभिमान दिवस आहे’ ‘तुम्ही सर्व या’ आणि दुसरीकडे पक्षातील जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी गोपीनाथराव मुंडेंच्या औरंगाबाद येथील नियोजित स्मारकासाठी उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट या दोन गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. त्यात आमच्या सरकारच्या काळात स्मारक मार्गी लागले नसल्याची खडसेंनी खंत व्यक्त करुन उद्धव ठाकरेंकडून व्यक्त केलेल्या अपेक्षाही बरेच काही सांगून जातात. दोन दिवसांतील औरंगाबाद व मुंबई येथील पक्षाच्या बैठकांकडे पाठ फिरविण्याची कारणे जरी पंकजा मुंडे यांनी सांगीतली असली तरी वरिल बाबी आणि दांडी हा काही योगायोगही म्हणता येणार नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंची भूमिका काय, याकडे लक्ष लागले आहे.

Image may contain: 1 person, smiling


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde may resign from BJP Tomorrow