पंकजा मुंडे नामदेवशास्त्रींच्या चरणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पाथर्डी  - भगवानगडाच्या ८५व्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांचे आशीर्वाद घेतले. ‘परक्‍यांनी आपल्यावर आक्रमण करू नये, हेच ध्येय असल्याने, घरातील वादामध्ये माघार घेण्यास मी तयार आहे,’ असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

तागडगाव (ता. शिरूर कासार, जि. बीड) येथे झालेल्या या नारळी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज झाली. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे या वेळी उपस्थित होते. भगवानगड भाषणमुक्त झाल्यामुळे महंत नामदेवशास्त्री यांनी या वर्षी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना नारळी सप्ताहाचे व्यासपीठ खुले केले होते. त्यामुळे सप्ताहाच्या सुरवातीला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, माजी आमदार सुरेश नवले, संदीप क्षीरसागर उपस्थित होते. नंतर आमदार जयदत्त क्षीरसागर यांनीही भेट दिली. काल्याच्या कीर्तनाने आज सप्ताहाची सांगता झाली, त्या वेळी पंकजा मुंडे उपस्थित होत्या. व्यासपीठावर आल्याबरोबर पंकजा यांनी डॉ. नामदेवशास्त्री यांच्या पायावर माथा टेकवून आशीर्वाद घेतले. या वेळी त्यांचे भाषण झाले. त्या म्हणाल्या, ‘‘संत भगवानबाबा व महंत नामदेवशास्त्री माझे गुरू आहेत. मी त्यांची भक्त आहे. त्यांच्या आशीर्वादानेच आपली वज्रमूठ कायम ठेवू.’’ काल्याच्या कीर्तनात महंत नामदेवशास्त्री म्हणाले, ‘‘सर्व जण भगवानगडाचे भक्त असल्यामुळे सर्वांनाच गडाचे आशीर्वाद आहेत. सर्वांनी मोठे व्हावे, समाजसेवा करावी, हीच भगवानगडाची भावना आहे.’’

Web Title: Pankaja Munde Namdevshastri bhagwand gad