
Pankaja Munde : वेगळी भूमिका घ्यायची असेल तर तुम्हाला बोलवून...; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजप सोडणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सतत सरु असतात. यादरम्यान भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज नववा स्मृतिदिनानिमीत्तबीडमधील परळीच्या गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी अशा चर्चांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी केल्याचे दिसून आले.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, भूमिका या समाजहिताच्या घ्यायच्या असतात. सगळ्यांना आवडणाऱ्या भूमीका घेणारा व्यक्ती एखाद्या वेळेस आमदारकी, खासदारकी किंवा मंत्रीपद मिळवू शकतो, पण तो नेता होऊ शकत नाही. मला हे सगळं मिळालं नाही. मला परळीतून पराभव स्वीकारावा लागला.
मला असं काही मिळालं नाही, तर मग मी काय करायला पाहिजे? तर माझी खरी भूमिका निभावली पाहिजे. मला जर वेगळी भूमिका घ्यायची असेल तर पंकजा मुडे अशीच तुम्हा सगळ्यांना बोलवेल आणि तुमच्या समोर बिनधास्त भूमिका घेईल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदूक चालवण्याएवढे खांदे मला अजून तरी मिळाले नाहीत. मात्र माझ्या खांद्याची रूंदी इतकी आहे की अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी विसावू देणार नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पंकजा मुंडे राजकारणात जी काही भूमिका घेईल ती छातीठोकपणे घेईल. आज ३ जून २०२३ पर्यंत ज्या भूमीका जाहीर मांडल्या त्यांच्याशी मी प्रामाणिक आहे, असेही त्या म्हणाले. अनेक जण निवडणूका हरले पण त्यांना संधी दिली गेली. दोन डझन अमदार-खासदार झालेत चार वर्षात. त्यामध्ये मी बसत नसेल तर लोक चर्चा करणार असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.