काँग्रेसच्या दयनीय स्थितीवर पंकजा मुंडेंचं खोचक ट्विट; अटलजींच्या 'त्या' वक्तव्याची आठवण

काँग्रेसच्या दयनीय स्थितीवर पंकजा मुंडेंचं खोचक ट्विट; अटलजींच्या 'त्या' वक्तव्याची आठवण

बीड: लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल काल लागले असून या पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजप तर पंजाबमध्ये आपची निर्विवाद बहुमताने विजयी झाला आहे. या पाचही राज्यांमध्ये काँग्रेसला फारसं समाधानकारक असं यश मिळालं नाहीये. इतकचं नव्हे तर पंजाबसारखं हातातलं राज्य अंतर्गत बंडाळीमुळे गमवावं लागलं आहे. एकूण पाच राज्यांच्या जागा एकत्रित केल्या तरीही काँग्रेसला शंभरी गाठता आलेली नाहीये. यूपीसारख्या राज्यामध्ये प्रियांका गांधींनी इतके प्रयत्न करुनही त्या ठिकाणी काँग्रेसला दोनच जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या या परिस्थितीवर आता चिंता व्यक्त केली जात असून विरोधकांकडून खिल्ली उडवली जात आहे. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या पंकजा मुंडे यांनी अटलजींच्या एका विधानाची आठवण करुन दिली आहे.

काँग्रेसच्या दयनीय स्थितीवर पंकजा मुंडेंचं खोचक ट्विट; अटलजींच्या 'त्या' वक्तव्याची आठवण
पंजाबच्या जनतेने क्रांती काय असते, दाखवून दिले : अरविंद केजरीवाल

27 वर्षांपूर्वी 1997 मध्ये एनडीएचं सरकार पडल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेत केलेल्या भाषणात एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचा दाखला पंकजा मुंडे यांनी दिला आहे. ट्विट करत त्यांनी या विधानाचा फोटो टाकला आहे. 'मेरी बात काँग्रेस कतई न भूले' असं सांगणारं हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं ट्विट आहे. वाजपेयी यांनी त्या भाषणात म्हटलेलं की, आज आमचं सरकार फक्त एका मतांनी पडलं आहे. आमच्याकडे कमी सदस्य असल्यामुळे काँग्रेस आमच्यावर हसत आहे मात्र, माझी ही गोष्ट काँग्रेसने कधीच विसरु नये. एक दिवस असा येईल की, जेंव्हा संपूर्ण भारतात आमचं सरकार असेल आणि संपूर्ण देश काँग्रेसवर हसत असेल.

काँग्रेसच्या दयनीय स्थितीवर पंकजा मुंडेंचं खोचक ट्विट; अटलजींच्या 'त्या' वक्तव्याची आठवण
ओबीसी आरक्षण : मागासवर्ग आयोगाकडील आरक्षणासाठीची कामे काढणार

आज तशीच काहीशी परिस्थिती असल्याचं पंकजा मुंडे यांनी सुचवायचं आहे.

कशा आहेत काँग्रेसच्या जागा

  • उत्तर प्रदेश : 403 पैकी 2 जागा

  • गोवा : 40 पैकी 11 जागा

  • उत्तराखंड : 70 पैकी 18 जागा

  • मणिपूर : 60 पैकी 5 जागा

  • पंजाब : 117 पैकी 18 जागा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com