Pankaja Munde | गोपीनाथ मुंडे स्मृतीदिन: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde
गोपीनाथ मुंडे स्मृतीदिन: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे लक्ष

गोपीनाथ मुंडे स्मृतीदिन: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे लक्ष

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आजा आठवा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रम होणार आहे. यासाठी राज्यभरातून मुंडे समर्थक येणार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यावेळी काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. (Pankaja Munde about programme in memories of Late bjp leader Gopinath Munde)

हेही वाचा: 'गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न मी सत्तेत बसून पूर्ण करतोय'; धनंजय मुंडे

यानिमित्त पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) कालच तयारीची पाहणी केली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, "दरवर्षी या कार्यक्रमात लोकांशी संवाद साधायची संधी मिळते. त्यांना माझ्याकडून कोणतीच अपेक्षा नसते. यामध्ये वेगवेगळे संकल्प आम्ही घेतो, दिशा ठरवतो. ही आता एक परंपराच झाली आहे. मी या कार्यक्रमात काय बोलेन हे मला तिथेच सुचतं. त्यामुळे तुम्हाला ते कार्यक्रमातच कळेल"

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपा पंकजा मुंडेंना उमेदवारी देणार का याबद्दल मुंडे समर्थकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे पंकजा यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. मागच्या निवडणुकीवेळी ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने पंकजा नाराज होत्या. त्याबद्दल गोपीनाथ गडावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीच्या आधी पंकजा मुंडे सभा घेणार आहेत. त्यामुळे हा औत्सुक्याचा विषय आहे.

Web Title: Pankaja Munde Speech On Gopinath Munde Death Anniversary About Elections

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top