पंकजा मुंडे यांना मंत्रालयात रोखले

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 जानेवारी 2019

मुंबई - धनगर समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही, अशा आशयाचे विधान केल्यानंतर काही तासांचा अवधी उलटल्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा यांनी मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंगळवारी मंत्रालयात प्रवेश केला. मात्र, या वेळी त्यांना मंत्रालयात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न धनगर समाजाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार रामराव वडकुते यांनी केला.

‘आम्ही पुन्हा सत्ता प्रस्थापित करणार आहोत, पण त्या सत्तेत विराजमान होत असताना धनगर आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करू शकणार नाही’ या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. मंत्रालयाची पायरी चढणार नाही, असे वक्तव्य मी केले नव्हते,’ असा दावा पंकजा मुंडे यांनी या वेळी केला.

पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती लावली. ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला’, असे स्पष्टीकरण त्यांनी या वेळी दिले. त्या म्हणाल्या, ‘‘वडकुते यांनी मला रोखण्यापेक्षा ७० वर्षांत जे धनगरांना आरक्षण देऊ शकले नाहीत त्यांना रोखावे. ते ज्या पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी धनगरांना आरक्षण का दिले नाही? जर मला रोखल्याने धनगर आरक्षण मिळणार असेल तर मला खुशाल रोखा.’’

Web Title: Pankaja Munde was stopped in the mantralaya