पनवेल, भिवंडी-निजामपूर, मालेगाव महापालिकांसाठी 24 मे रोजी मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई - पनवेल, भिवंडी-निजामपूर, मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मे रोजी मतदान; तर 26 मे रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.

आयोगाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सहारिया यांनी सांगितले की, नवनिर्मित पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेची मुदत 10 जून 2017; तर मालेगाव महानगरपालिकेची मुदत 14 जून 2017 रोजी संपत आहे. भारत निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदार संघाची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. एकूण 64 प्रभागांतील 252 जागांसाठी निवडणूक होत असून, इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची मुदत 29 एप्रिल 2017 पासून 6 मेपर्यंत असेल. रविवारी (ता. 30 एप्रिल) नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील; परंतु 1 मे च्या सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत, असेही सहारिया यांनी स्पष्ट केले.

Web Title: panvel, bhivani-nijampur, malegav municipal election