पनवेल महापालिकेत भाजप, शेकापत काट्याची लढत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या 78 जागांसाठी झालेल्या मतदानाची आज (शुक्रवार) मतमोजणी होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षात काट्याची लढत होण्याची शक्‍यता आहे.

पनवेल : नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या 78 जागांसाठी झालेल्या मतदानाची आज (शुक्रवार) मतमोजणी होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षात काट्याची लढत होण्याची शक्‍यता आहे.

पनवेलमधील ग्रामीण आणि शहरी भागातील मतदार कुणाला कौल देतो, त्यावर कोण बाजी मारणार ते महत्वाचं ठरणार आहे. शेकापने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाआघाडी करुन भाजपला आव्हान निर्माण केलंय. भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढवली गेलीय.

भिवंडी
भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या 90 जागांसाठी झालेल्या मतदानाचाही आज निकाल आहे. भिवंडीमध्ये भाजप-कोणार्क विकास आघाडी, काँग्रेस, समाजवादी पक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, शिवसेना यांच्यात प्रमुख लढत आहे. भिवंडीतील मुस्लिम बहूल प्रभागाताही भाजपने आपले उमेदवार दिले आहेत. तर हिंदू बहूल विभागात भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आहे.

मालेगाव
मालेगावच्या 84 जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल आघाडी, काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि एमआयएममध्ये चुरस आहे. मालेगावमध्ये आतापर्यंत काँग्रेस, एनसीपी आणि जनतादल यांना सत्ता मिळालीय. पण यावेळी भाजपनेही मुस्लिम बहुल प्रभागात उमेदवार दिले आहेत.

Web Title: panvel election, panvel news, bhiwandi news, malegaon news, election results, corporation election result