दहावीनंतर नक्की कुठे घ्यायचा प्रवेश? पालक आणि विद्यार्थी चिंतेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावीनंतर नक्की कुठे घ्यायचा प्रवेश? पालक आणि विद्यार्थी चिंतेत

दहावीनंतर नक्की कुठे घ्यायचा प्रवेश? पालक आणि विद्यार्थी चिंतेत

नागपूर : कोरोना (Corona Update) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जवळपास १७ लाख विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे अकरावी, तंत्रनिकेतन (Polytechnic admissions) आणि आयटीआयच्या (ITI Admission) केवळ ९ लाख जागा आहेत. मात्र, प्रवेशासंदर्भात शिक्षण विभागाने अद्याप कुठलाही निर्णय जाहीर न केल्याने विद्यार्थी आणि पालकांवरील प्रवेशाचे दडपण वाढले आहे. (Parents and students have confusion about after 10th admissions)

हेही वाचा: कोरोना नाही तर 'या' आजाराचं मेळघाटातील गावात थैमान

दहावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जवळपास १७ लाख विद्यार्थी अकरावी, तंत्रनिकेतन आणि आयआयटी आदींसाठी पात्र ठरणार आहेत. राज्यात दहावीनंतर विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अभ्यासक्रमांची क्षमता ही ९ लाख आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचे काय? त्यांच्या पुढील वर्गातील प्रवेशाचे काय?

सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात येणार असल्याने त्यांना किती गुण मिळणार हेही सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांना कशाच्या आधारावर त्यांना प्रवेश मिळणार आहे? यासंदर्भात अद्यापही संभ्रम आहे. कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेतील प्रवेश कुठल्या आधारावर होतील याचा निर्णय नंतर जाहीर केला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, त्यावर अजूनही निर्णय न झाल्याने शालेय शिक्षण विभागाने परीक्षा रद्द करून काय साध्य केले? असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा: ब्रेकिंग : गडचिरोलीत पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक; काही नक्षलवाद्यांचा मुत्यू

मागील वर्षी मुक्त विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा सर्वांसाठी आदर्शवत ठरली. शिक्षण मंडळाने अशा विद्यापीठांचे मार्गदर्शन घेऊन इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा आयोजित करून त्याच्या स्वरूपाची घोषणा लवकर करावी.
-डॉ. संजय खडक्कार, विद्वत परिषद सदस्य, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.
सरकारच्या या निर्णयाने गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांचा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश हुकणार आहे. हे टाळण्यासाठी लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत योग्य निर्णयाची अपेक्षा आहे.
-डॉ. तेजश्री दातारकर, पालक

(Parents and students have confusion about after 10th admissions)

loading image
go to top