‘पतंजली’मुळे वार्षिक एक अब्जाची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नेवासे - पतंजली दूध प्रकल्पामुळे दरवर्षी एक अब्ज रुपयांची उलाढाल होईल. सुरवातीला रोज पाच लाख लिटर दूधसंकलन करणार असून, वर्षभरात ते १० लाख लिटरवर नेऊ. दुधासह गोमूत्रही खरेदी केले जाईल, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी बुधवारी सांगितले.

नेवासे - पतंजली दूध प्रकल्पामुळे दरवर्षी एक अब्ज रुपयांची उलाढाल होईल. सुरवातीला रोज पाच लाख लिटर दूधसंकलन करणार असून, वर्षभरात ते १० लाख लिटरवर नेऊ. दुधासह गोमूत्रही खरेदी केले जाईल, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी बुधवारी सांगितले.

तालुक्‍यातील खडके फाटा येथे ‘पतंजली डेअरी’च्या उद्‌घाटनानिमित्त गोपालक व शेतकरी यांचा मेळावा झाला. त्यात रामदेवबाबा बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पंतजली उद्योगातून मिळणारा सगळा पैसा फक्त देशाच्या विकासासाठीच वापरला जातो. दुधाप्रमाणे आम्ही कोरफड, आवळाही खरेदी करणार आहोत. त्याच्या उत्पादनासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. देशी गाईंच्या दुधाला चांगला भाव दिला जाईल. राज्यात दूधक्रांती घडविणारा हा प्रकल्प ठरेल. सध्या शेतकऱ्यांना देशी गाई पाळणे परवडत नाही. त्यामुळे ‘पतंजली’च्या माध्यमातून संशोधन करून २५ ते ५० लिटर दूध देणाऱ्या देशी गाई शेतकऱ्यांना दिल्या जातील. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना दरवर्षी १० हजार कोटी रुपये मिळतील. कोरफड, आवळा याच्या खरेदीतून पाच हजार कोटींची उलाढाल होईल.’’

‘पतंजली’ला नियमानुसारच जागा : मुख्यमंत्री

खडकेफाटा (ता. नेवासे) -  ‘‘नागपूरच्या अन्नप्रक्रिया पार्कमध्ये उद्योगासाठी तीन वेळा निविदा काढून ‘पतंजली’ला रीतसर जागा दिली. त्यावरून होणारे आरोप बिनबुडाचे असून, ‘पतंजली’ने ज्या दराने जागा घेतली, त्याच दराने इतरांनाही देण्याची तयारी आहे,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. ‘पतंजली डेअरी’चे उद्‌घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

Web Title: Patanjali due to an annual turnover of one billion