पतंजलीचे कोरोनिल महाराष्ट्रात मिळणार का? तर गृहमंत्री म्हणतात...

वृत्तसंस्था
Thursday, 25 June 2020

ट्विट करून गृहमंत्र्यांची माहिती 

रोगप्रतिकारकशक्ती संदर्भात औषधांची परवानगी

नवी दिल्ली : कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर आता यावर उपाय म्हणून अनेक औषधांची निर्मिती केली जात आहे. त्यामध्ये आता पतंजलीने कोरोनावर उपाय म्हणून कोरोनिलची निर्मिती केली. मात्र, यावर राजस्थान सरकारने बंदी घातली. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही यावर बंदी घातली आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनावर गुणकारी औषध शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात आहेत. त्यातच पतंजलीने कोरोना व्हायरसवर उपाय म्हणून औषधाची निर्मिती केल्याचा दावा केला होता. त्यातून कोरोनावर 100 टक्के इलाज केला जाऊ शकतो, असाही दावा केला होता. परंतु या औषधावरून आता नवी माहिती समोर आली आहे. राजस्थान सरकारने या कोरोनिल औषधाला राज्यात परवानगी नाकारली होती. त्यानंतर आता पतंजलीच्या कोरोनिलला महाराष्ट्र सरकारनेही मोठा झटका दिला आहे. 

ट्विट करून गृहमंत्र्यांची माहिती 

पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्याबाबतची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून दिली. यामध्ये त्यांनी सांगितले, की जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने क्लिनिकल ट्रायल घेतली का, याची माहिती घेण्यात येईल. तसेच बनावट औषधांना महाराष्ट्रात विकण्यास परवानगी मिळणार नाही, असे स्पष्ट केले.

रोगप्रतिकारकशक्ती संदर्भात औषधांची परवानगी

खोकला, ताप व रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याच्या औषधाची परवानगी पतंजलीने आयुर्वेद विभागाकडून घेतली होती. पण आता त्यांनी कोरोनावर औषध निर्माण केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जाहिरातीवर तातडीने बंदी

कोरोनिल हे औषध पतंजलीने मंगळवारी लाँच केले. त्यानंतर काही तासांतच याबाबतच्या जाहिराती बंद करण्याचे आदेश केंद्रीय आयुष मंत्रालयाने जारी केले होते. यामध्ये केंद्राने म्हटले, की औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी.

लायसेन्सच्या अर्जात कोरोनाचा उल्लेख नाही

पतंजलीने या औषधाच्या निर्मितीसाठी अर्ज केला होता. त्या अर्जानुसार पतंजलीला लायसन्स देण्यात आले. मात्र, त्यांनी लायसन्सच्या अर्जात कुठेही कोरोना व्हायरसचा उल्लेख केलेला नव्हता. पतंजलीला फक्त रोगप्रतिकारकशक्ती, खोकला व ताप यावर औषध बनवण्याचीच परवानगी दिली होती. 

Coronavirus medicineपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patanjalis Coronil is not allowed in Maharashtra