Patrakar Din| एका पत्रकाराचा पंतप्रधान होण्याचा प्रवास, वाचा वाजपेयींच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Patrakar Din

Patrakar Din: एका पत्रकाराचा पंतप्रधान होण्याचा प्रवास, वाचा वाजपेयींच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट

मुंबई : अटलबिहारी राजकारणात कसे आले यामागे एक प्रेरणादायी कथा आहे. प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाच्या घरात जन्मलेल्या वाजपेयींसाठी राजकारणात जाणे हे एखाद्या स्वप्ना प्रमाणेच होते.

5 डिसेंबर 1924 रोजी ग्वाल्हेरमधील निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या वाजपेयींचे प्रारंभिक शिक्षण ग्वाल्हेरमधील व्हिक्टोरिया (आता लक्ष्मीबाई) महाविद्यालयात आणि कानपूरमधील डीएव्ही महाविद्यालयात झाले .त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि पत्रकारितेतून करिअरला सुरुवात केली. हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

राष्ट्रधर्म, पांचजन्य आणि वीर अर्जुन या वृत्तपत्रांचे आणि मासिकांचे त्यांनी संपादन केले. ते लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले होते आणि या संघटनेच्या विचारसरणीच्या (राष्ट्रवाद किंवा उजव्या विचारसरणीच्या) प्रभावामुळे देशाप्रती काहीतरी करण्याची, समाजकार्य करण्याची भावना त्यांच्यात दृढ झाली. त्यासाठी त्यांना पत्रकारिता हा उत्तम मार्ग समजला आणि ते पत्रकार झाले.

त्यांच्या आयुष्यातील पत्रकार ते राजकारणी असा टर्निंग पॉइंट एका महत्त्वाच्या घटनेशी जोडला गेला आहे. याबाबत खुद्द अटल बिहारी यांनी ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंह यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

१९५३ ची गोष्ट आहे, भारतीय जनसंघाचे नेते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी काश्मीरला विशेष दर्जा देण्याच्या विरोधात होते. जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेल्या परमिट पद्धतीला विरोध करण्यासाठी मुखर्जी श्रीनगरमध्ये जाऊन आंदोलन करणार होते.

परमिट प्रणालीनुसार, कोणत्याही भारतीयाला जम्मू-काश्मीर राज्यात स्थायिक होण्याची परवानगी नव्हती. इतकेच नाही तर इतर राज्यातील कोणत्याही व्यक्तीला जम्मू-काश्मीरमध्ये जाण्यासाठी ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक होते. त्याला विरोध करत डॉ. मुखर्जी यांनी परमिट सिस्टीम मोडून त्यांनी श्रीनगर गाठले.

पत्रकार या नात्याने वाजपेयींनीही घटना कव्हर करण्यासाठी सोबत घेतले. वाजपेयी आपल्या मुलाखतीत सांगतात,

'मी त्यांच्यासोबत पत्रकार म्हणून होतो. त्यांना अटक करण्यात आली. पण आम्ही परत आलो. डॉ. मुखर्जींनी मला सांगितले की , ‘वाजपेयी तू जा आणि जगाला सांगा की मी कोणत्याही परवानगीशिवाय काश्मीरमध्ये आलो आहे.'

या घटनेनंतर काही दिवसांनी नजरकैदेत असलेले डॉ.मुखर्जी यांचे आजारपणामुळे निधन झाले. या घटनेने वाजपेयी खूप दुखावले गेले.ते मुलाखतीत म्हणतात, 'मला वाटले की डॉ. मुखर्जींचे कार्य पुढे नेले पाहिजे.' यानंतर वाजपेयींनी राजकारणात प्रवेश केला. 1957 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले.

टॅग्स :journalist