बहुप्रतिक्षित ‘शक्ती कायदा’ लागू होण्याचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींची स्वाक्षरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शक्ती कायदा

बहुप्रतिक्षित ‘शक्ती कायदा’ लागू होण्याचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींची स्वाक्षरी

महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कारवाई करता यावी यासाठी तसेच प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी ‘महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट-२०२०’ विधेयक २०२० सालच्या अधिवेशनात मांडण्यात आले होते. या विधेयकाला महाविकास आघाडी सरकारने मंजूर केले होते. आता बहुप्रतिक्षित शक्ती विधेयकावर (Shakti Act) राष्ट्रपतींची स्वाक्षरी (Signature of the President) झाल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

महिला सुरक्षेच्या दिशेने पाऊल टाकत महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत शक्ती विधेयक मंजूर केले होते. बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा आणि ऑसिड हल्लेखोरांना १५ वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. या विधेयकामुळे महिलांना नवी शक्ती मिळाली आहे. आता हा कायदा लागू होणार असल्याने महिला अत्याचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो.

हेही वाचा: रशियावर लादलेल्या निर्बंधाचा भारताला फायदा; स्वस्तात खरेदी करणार तेल!

‘बहुप्रतिक्षित शक्ती विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहे. यामुळे राज्यामध्ये ‘शक्ती कायदा’ (Shakti Act) लागू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्राने टाकलेले हे पाऊल निश्चितच आश्वासक असून, हा कायदा समस्त महिलांसाठी शक्ती सुरक्षा कवच ठरणार आहे’, असे ट्विट रूपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी केले आहे.

महाविकास आघाडी सरकारने शक्ती विधेयक मंजूर केल्यानंतर राज्यपालांकडे पाठवले होते. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरच या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होणार होते. आता शक्ती विधेयकावर (Shakti Act) राष्ट्रपतींची स्वाक्षरी (Signature of the President) झाली आहे. यामुळे राज्यामध्ये शक्ती कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे महिलाही सुरक्षित राहणार आहेत.

हेही वाचा: ...तर आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार; सोनिया गांधींनी केलं स्पष्ट

महत्त्वाच्या तरतुदी

  • महिलांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी २१ दिवसांत आत आरोपपत्र दाखल केले जाईल.

  • ॲसिड हल्ला आणि महिलांवरील बलात्कारासारखे गुन्हे अजामीनपात्र केले जातील.

  • ई-मेल, इलेक्ट्रॉनिक किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे महिलांचा छळ होत असल्यास आणि चुकीची टिप्पणी केली गेली तर त्यांना कठोर शिक्षा देखील केली जाईल.

  • डिजिटल मेसेजद्वारे त्रास दिल्यास दोन वर्षांच्या तुरुंगवासासह शिक्षेची तरतूद

  • सामूहिक बलात्कार किंवा बलात्काराच्या दुर्मीळ प्रकरणांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद

  • बलात्कार केसेस जन्मठेप किंवा जन्मठेप म्हणून वर्गीकृत

  • १६ वर्षांखालील मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी १० लाखांचा दंड किंवा जन्मठेपेची शिक्षा

Web Title: Pave The Way For Enforcement Of The Shakti Act Signature Of The President Rupali Chakankar Tweet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top