'वेतन आयोग राज्य कर्मचाऱ्यांना नको' - आशीष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नागपूर - सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नवी वेतनश्रेणी लागू करू नये, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते आशीष देशमुख यांनी केली आहे.

नागपूर - सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नवी वेतनश्रेणी लागू करू नये, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते आशीष देशमुख यांनी केली आहे.

राज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक तालुक्‍यांमध्ये भीषण दुष्काळ पडलेला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीमालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. या स्थितीमध्ये येत्या 1 जानेवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगाच्या शिफारशींप्रमाणे वेतनश्रेणी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य नसून, यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 24 हजार कोटी रुपयांचा ताण पडणार आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी किमान 6 ते 7 महिने प्रलंबित ठेवाव्यात, अशी सूचना आशीष देशमुख यांनी केली आहे.

Web Title: Pay Commission are not for the state employees Ashish Deshmukh