शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न महाविकास आघाडी सरकार सोडविणार : वळसे पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना लागू करावी, आदी मागण्यांचा राज्य शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

मंचर : कनिष्ठ महाविद्यालयिन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याबाबत महाविकास आघाडीचे सरकार गांभीर्याने विचार करील. राज्याचे शिक्षणमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याबरोबर चर्चा करून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन विधान सभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे आणि सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ नागपूर येथे वळसे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी पुणे जिल्हा जुक्टोचे सरचिटणीस प्रा. लक्ष्मण रोडे, सदस्य प्रा. शरद सोमवंशी, प्रा. डॉ. मिलिंद कांबळे, प्रा. अरूण गोरडे आणि विदर्भ जुक्टोचे पदाधिकारी उपस्थित होते. 

- उद्धव ठाकरेंचा संभाजीराजेंना फोन; पत्राची घेतली तात्काळ दखल

"1 नोव्हेंबर 2005 पूर्वी टप्पा अनुदानावर नियुक्त कनिष्ठ महाविद्यालयिन शिक्षकांना जूनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी. 2005 नंतराच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. घोषित मुल्यांकन पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना अनूदान द्यावे. 

- मराठा तरुणांचे पंख छाटण्याचे प्रयत्न; 'सारथी' संस्थेला मदत बंद

तसेच राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना लागू करावी, आदी मागण्यांचा राज्य शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

- दिल्ली ठप्प; इंटरनेटसेवा बंद, मेट्रोवरही परिणाम; CAA विरोधात आंदोलन तीव्र

Image may contain: 5 people, people sitting and text


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pending demands of teachers will be resolved by the state government says Dilip Walse Patil