संगेवाडी येथील लोकचळवळीला ‘सकाळ’ची साथ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

संगेवाडी - संगेवाडी (ता. सांगोला) येथे ‘सकाळ रिलीफ फंडा’तून येथील तनिष्का गटाच्या माध्यमातून ओढ्यातील व बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामाचा आज प्रारंभ झाला. येथील ग्रामस्थांनी ओढ्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी लोकचळवळ उभी केली आहे. आता ओढ्यातील व बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम ‘सकाळ’ने हाती घेऊन ग्रामस्थांच्या लोकचळवळीला पाठिंबा दिला आहे. ‘सकाळ’च्या या कामाचे ग्रामस्थांनी व विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

गाळ काढण्याच्या कामाच्या उद्‌घाटन वेळी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, युनिट मॅनेजर किसन दाडगे, तालुका कृषी अधिकारी एम. जी. तोडकरी, पंचायत समिती सदस्य नारायण जगताप, सांगोला कारखान्याचे संचालक शहाजी नलवडे, कृषी पर्यवेक्षक दीपक ऐवळे, ए. एस. चव्हाण, सरपंच नंदाबाई खंडागळे, उपसरपंच नंदादेवी वाघमारे, सुरेखा शिंदे, आरती होवाळ, सुमन खंडागळे, सुमन पवार, लक्ष्मी कोळी, माणिक वाघमारे, ग्रामसचिव मंगेश पोरे आदी उपस्थित होते. या वेळी दीपक साळुंखे-पाटील म्हणाले, की दुष्काळ निर्मूलनासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने जी गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली आहे, ती अतिशय कौतुकास्पद आहे. येथील नागरिकांनीही सर्व गट-तट विसरून एकत्रित येऊन या कामाला पाठिंबा दिला पाहिजे. अर्चना वाघमळे म्हणाल्या, की सांगोला तालुका कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. हा दुष्काळ कमी करण्यासाठी जमिनीवर पडणारा थेंब न्‌ थेंब जमिनीत मुरविला पाहिजे. तसेच दुष्काळमुक्तीसाठी चिलारमुक्त मोहीम राबविणे आज काळाची गरज आहे. या वेळी एम. जी. तोडकरी, अभय दिवाणजी, किसन दाडगे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या वेळी सुभाष खंडागळे, राजकुमार पवार, चेतनसिंह केदार, सूर्यकांत खंडागळे, बाळासाहेब भुसे, दामोदर पवार, दामोदर वाघमारे, श्रीकांत खंडागळे, दीपक शिंदे, भारत कदम, संतोष खंडागळे, अप्पासाहेब खंडागळे, बाळासाहेब वाघमारे, राजू खंडागळे, शरद होवाळ, शिवाजी होवाळ, रवींद्र खंडागळे, समाधान होवाळ उपस्थित होते. श्री. पोरे यांनी प्रास्ताविक केले. दत्तात्रय खंडागळे यांनी सूत्रसंचालन केले. तनिष्का सदस्या सुवर्णा उन्हाळे यांनी आभार मानले.

साळुंखे-पाटील यांची मदत
दरम्यान, या कार्यक्रमामध्ये माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी (कै.) काकासाहेब साळुंखे-पाटील ट्रस्टच्या वतीने या कामासाठी एक दिवस डिझेल भरून जेसीबी देण्याचे जाहीर केले.

Web Title: People movement in Sanggewadi