...तर 'मोदी गो बॅक'चे नारे लागतील- ओवेसी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

उदगीर : पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहणाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. एकदा त्यांनी रांगेत उभ्या असलेल्या लोकांसमोर येऊन भाषण द्यावे, 'मोदी गो बॅक' चे नारे लागल्याशिवाय राहणार नाही असा दावा एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उदगीरच्या सभेत केला. 

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. नोटाबंदीनंतर मोदींनी 50 दिवसात सगळं ठीक करतो असे सांगितले होते, त्यांच्या या विधानाची खिल्ली उडवतांना 'तुमच्याकडे अलाद्दीनचा चिराग आहे का' अशी खोचक टीकाही ओवेसी यांनी यावेळी केली. 
'अच्छे दिन तर सोडा, बुरेही नाही पण बरबादीचे दिन मात्र पंतप्रधानांनी आणले आहेत. मोदी जर अभिनय करत असते तर सुपरहिट झाले असते' असा टोला ओवेसी यांनी लगावतांनाच 'भारत माता की जय' असे आपण आजही म्हणणार नाही, त्या निर्णयावर ठाम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 
मी बाबासाहेबांनी तयार केलेली राज्यघटना मानतो, सावरकरांना नाही तर गांधींजींनी मानतो असेही ते म्हणाले. 

एमआयएम व भाजपची सेटलमेंट असल्याच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून जो आरोप केला जातो त्याचा समाचार घेताना ओवेसीनी या दोन्ही पक्षांची तुलना सैतानाशी केली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार नव्हते, मग तुम्ही का हरलात, असा सवाल करतांना 'सैतानो सुधर जाओ' अशा शब्दात ओवेसी यांनी विरोधकांना खडसावले. 
 
Web Title: people will shout 'Modi go back', says owaisi