प्रगतीविषयी लोकांच्‍या मनात शंका - जयंत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मुंबई - भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेली अनेक वर्षे या देशात प्रगतीचा विचार आपण करत होतो, परंतु गेल्या चार वर्षांच्या कालखंडामध्ये प्रगतीविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली. देशाचा ७२ वा स्वातंत्र्यदिवस राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी जयंत पाटील बोलत होते.

या देशातील आर्थिक, सामाजिक क्षेत्रात प्रगती करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली गेली अनेक वर्षे मांडलेली आहे. शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ज्या उद्देशाने पक्षाची स्थापना करून देशाची आणि राज्याची प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचे पुढचे पाऊल टाकण्याची ताकद स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी येवो आणि आज पक्षातील उत्साह बघून पुढच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून होणारे भाषण तुमच्या-माझ्या मनातील माणसाचं  असेल, असा आशावाद त्यांनी व्यक्‍त केला.

जनतेचा अपेक्षाभंग
या देशात आतापर्यंत आम्ही जी प्रगती साधली त्या प्रयत्नाचे आता पुढचे पाऊल पडेल अशी आशा होती, परंतु आज वर्तमानपत्र उघडल्यानंतर या देशातील एखाद्या बॅंकेतील पैसेच आपोआपच दुसऱ्या बॅंकेत निघून जातात. या देशातील निवडणुका एका दिवसात घेण्याचा प्रयत्न सुरू असताना त्याही शक्‍यता बदलून वेगवेगळे घटक शंका व्यक्त करतात. या देशातील व्यवस्था भविष्यकाळाकडे बघत असताना या देशातील रुपयादेखील ७० रुपयांच्या वर जायला लागतो हे पाहायला मिळत आहे. 

Web Title: Peoples doubts about progress says jayant patil