अल्पवयीन मुलीला गर्भपाताची परवानगी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई - बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या 13 वर्षांच्या मुलीला गर्भपात करण्याची परवानगी आज मुंबई उच्च न्यायालयाने दिली. या मुलीच्या वतीने तिच्या वडिलांनी न्यायालयात गर्भपाताची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती. खंडपीठाने मुलीशी गेल्या आठवड्यात संवाद साधला होता. तिची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देशही न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाला दिले होते.

गर्भधारणेमुळे मुलीच्या प्रकृतीला धोका असून, मानसिकदृष्ट्याही ती खचलेली असल्याचे रुग्णालयाच्या अहवालात नमूद होते. त्यामुळे 24 आठवड्यांची गर्भवती असलेल्या मुलीला गर्भपात करण्याची परवानगी न्यायालयाने दिली. अशा परिस्थितीमध्ये पोलिस यंत्रणा कशी काम करते, त्याबाबत काही नियमावली आहे का, याबाबतचा तपशील दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले. 

Web Title: Permission for abortion to a minor girl