भुजबळांची याचिका मागे घेण्यास संमती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

मुंबई - महाराष्ट्र सदन गैरव्यवहारातील आरोपी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची त्यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका मागे घेण्यास मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. 

मुंबई - महाराष्ट्र सदन गैरव्यवहारातील आरोपी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची त्यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका मागे घेण्यास मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. 

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) तरतुदीनुसार अंमलबजावणी संचालनालयाने भुजबळांना अटक केली आहे. या कायद्याच्या कलमांना त्यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे; मात्र आता नवे मुद्दे नमूद करायचे आहेत. त्यामुळे याचिका मागे घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांच्या वतीने ऍड. विक्रम चौधरी यांनी न्यायाधीश रणजित मोरे यांच्या खंडपीठाला केली. न्यायालयाने त्यास परवानगी दिली; मात्र शुक्रवारपर्यंत नवी याचिका दाखल करण्यासही सांगितले. 

Web Title: The petition to leave behind Bhujbal