आता थोडेसे 'सस्ते दिन'; पेट्रोल पाच रूपयांनी स्वस्त!

Petrol Diesel Price reduced by total five rupees in State
Petrol Diesel Price reduced by total five rupees in State

मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर आता राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलच्या किमतीत अडीच रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला पेट्रोल-डिझेलच्या दरात एकूण पाच रुपयांचा दिलासा मिळणार आहे. इंधन कपातीबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज इंधनाचे दर अडीच रुपयांनी कमी केले आहेत. त्यानंतर राज्य सरकारनेही इंधनाच्या दरात अडीच रुपयांनी कपात केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात एकूण पाच रुपयांनी कपात करण्यात येणार आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com