पीएफ कार्यालयाचा कारभार ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

सातपूर - देशातील सर्वात जास्त निवृत्ती वेतनधारक व पीएफ खातेदार म्हणून नावलौकीक असलेल्या येथील पीएफ कार्यालयाने आपला संपूर्ण कारभार हा ऑनलाईन केला असून, देशात असे कामकाज करणारे हे पहिले कार्यालय ठरले असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

भविष्य निर्वाहनिधीचे (पीएफ) आयुक्त एम. एम. आशरफ यांनी ही माहिती दिली. नाशिक विभागातील खातेदारांचे केवायसी पूर्ण करण्याचे काम सध्या सुरू आहे. ३१ डिसेंबरअखेर ते पूर्ण करण्याची मुदत आहे. दरम्यान, ऑनलाईन कामकाजामुळे खातेदाराला स्वत:चे पैसे काढण्यासाठी मालक व व्यवस्थापक यांच्या सही शिक्‍याची गरज नाही. तसेच क्‍लेम सेटलमेंट काही तासांतच होत आहे. 

११० आस्थापनांना नोटीस
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी १९५२ च्या कायद्यानुसार कर्मचाऱ्यांचे पीएफ वेळेवर खात्यात जमा न करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील ३१८ आस्थापनांवर कारवाई सुरू आहे. त्यापैकी ११० आस्थापनांना नोटीस बजाविण्यात आली असून २०८ आस्थापनांना नोटीस बजाविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पाच संस्थावर जप्तीची कारवाई
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सातपूरमधील ज्योती स्ट्रेचर. एक्‍सलो इंडिया लि, बीसीएल, चोपडा (जि. जळगाव) व अहमदनगर येथील दोन साखर कारखान्यांवर संपत्ती जप्तीची कारवाई सुरू केली आहे.

नाशिक विभाग दृष्टिक्षेपात
    १ लाख ३९ हजार निवृत्ती वेतन धारक
    १ लाख १२ हजार यूएन क्रमांक व केवायसी पूर्ण
    ३ लाख ८० हजार सन २०१७ नवीन खातेदारांची नोंद
    ४ लाख ३८ हजार १८ डिसेंबरपर्यंत नवीन खातेदारांची नोंद 
(सिन्नर, धुळे, जळगाव, नगर जिल्ह्यातील कर्मचारी)

Web Title: PF Office Work Online