'पीएफआय'चा 40 वर्षीय कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात! रेकॉर्डवरील कार्यकर्ता खूपच अ‍ॅक्टिव्ह

सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. राज्यात 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'च्या माध्यमातून काहीतरी अनुचित प्रकार घडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहरातील एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Police-Bandobast
Police-BandobastSakal

सोलापूर : सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. राज्यात 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'च्या माध्यमातून काहीतरी अनुचित प्रकार घडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर देशभरातील 'पीएफआय' च्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे. सोलापूर शहरात पण त्या संघटनेचा एक कार्यकर्ता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे प्रतिनिधी व कार्यकर्ते पोलिसांकडून ताब्यात घेतले जात आहेत. सोलापूर शहरातील एक 40 वार्षिक तरुण त्या संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर त्याची नोंद आहे. विजापूर नाका पोलिसांनी त्याला मंगळवारी (आज) पहाटे साडेपाच वाजता त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, त्याला थोड्या वेळाने जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. नवरात्रोत्सव सुरू असल्याने त्याला तोवर पोलिस कोठडी द्यावी, पीएफआय संघटनेचा काही प्लॅन आहे का, याची पण सखोल चौकशी करण्याच्या अनुषंगाने पोलिस त्याच्या कोठडीची मागणी करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com