esakal | लसीकरण, चाचणीसाठी दिव्यांगाना रांगेत थांबण्याची आवश्यकता नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

physically disabled

दिव्यांग व्यक्तींना कोरोना चाचणी, लसीकरण आणि कोरोना बाधित असल्यावर उपचारासाठी प्राधान्य देण्यात यावे. त्यांना कोणत्याही रांगेत उभे करू नये, असे निर्देश राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.

लसीकरण, चाचणीसाठी दिव्यांगाना रांगेत थांबण्याची आवश्यकता नाही

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे- दिव्यांग व्यक्तींना कोरोना चाचणी, लसीकरण आणि कोरोना बाधित असल्यावर उपचारासाठी प्राधान्य देण्यात यावे. त्यांना कोणत्याही रांगेत उभे करू नये, असे निर्देश राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. सामान्य व्यक्तीच्या तुलनेत दिव्यांगाना कोरोनाचा अधिक धोका असतो. ही बाब लक्षात घेत सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री मुंडे यांनी राज्यातील दिव्यांग व्यक्तींना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी घेतले आहेत.(physically disabled does not have to wait in line for vaccination test)

हेही वाचा: पुणे जिल्ह्याला २० कोटींचा निधी !

दिव्यांग कर्मचाऱ्यांना सवलत:

सध्या दळणवळणाची सुविधा पुरेशी नाही. तसेच, विविध कार्यालयांमध्ये १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याची मुभा आहे. ही बाब लक्षात घेत सरकारी कार्यालयांमधील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम ची सुविधा संबंधित विभागांनी उपलब्ध करून द्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात येऊन पुढील आदेश जारी होईपर्यंत हे आदेश लागू राहतील. या निर्णयामुळे दिव्यांग व्यक्तींना दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचे दिव्यांग कर्मचारी संघटना आणि विविध सामाजिक संस्थांनी स्वागत केले आहे.

loading image