'दौंडमधील नाट्यगृह, क्रीडा संकुलासाठी जागा देणार'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

मुंबई - दौंडमध्ये अद्ययावत नाट्यगृह व क्रीडा संकुलासाठी दहा एकर जागा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. 

दौंडमध्ये नाट्यगृह व क्रीडा संकुलासाठी नगर परिषदेला जागा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या वेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, दौंडचे आमदार राहुल कुल आदी या वेळी उपस्थित होते. दौंडमध्ये अद्ययावत सुविधा असलेले नाट्यगृह तसेच क्रीडा संकुल उभारण्यासाठी दहा एकर जागा देण्यासंदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

Web Title: Place for the theater sports complex in Daund