प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

वगळण्यात येणाऱ्या बाबी 
- औषधांच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक 
- कृषी, वन व फलोत्पादनासाठी, घनकचरा हाताळण्यासाठी लागणाऱ्या रोपवाटिकांमध्ये वापरण्यात येणारी प्लॅस्टिक पिशवी 
- दूध पॅकेजिंगसाठी अन्न साठवणुकीचा दर्जा असलेल्या, परंतु 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाड नसलेल्या प्लॅस्टिक पिशव्या 

पुणे : राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदीची अधिसूचना जाहीर केल्यानंतर शहरात पहिल्याच दिवशी बंदीबाबत प्लॅस्टिक उत्पादक आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाची स्थिती दिसून आली. दरम्यान, प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाबाबत येत्या सोमवारी संबंधित अधिकारी आणि व्यापाऱ्यांची बैठक बोलावण्यात येईल, त्यानंतर कारवाईची रूपरेषा निश्‍चित करण्यात येणार असल्याचे पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले. 

प्लॅस्टिक कचऱ्यामुळे माणसांबरोबरच वन्य आणि सागरी जिवांवर दुष्परिणाम दिसून येत आहे. नाले आणि गटारात कचरा अडकल्यामुळे शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन जीवित व वित्तहानी होत आहे. त्यामुळे प्लॅस्टिक आणि थर्माकोलपासून बनविलेल्या वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. 

या उत्पादनांवर बंदी :
- प्लॅस्टिक आणि थर्माकोलपासून बनविण्यात येणाऱ्या पिशव्या 
- प्लॅस्टिक, थर्माकोलची ताटे, कप, डिश, ग्लास, वाटी, चमचे, 
- हॉटेलमध्ये अन्न पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारी भांडी, स्ट्रॉ, द्रवपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे 
प्लॅस्टिक पाऊच 
- सर्व प्रकारचे अन्नपदार्थ आणि धान्य साठविण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी 
- प्लॅस्टिक आणि थर्माकॉलच्या सजावटीवर बंदी 

पुनर्खरेदी बंधनकारक 
- उत्पादक, विक्रेते आणि वितरकांवर प्लॅस्टिक बाटल्यांच्या पुनर्खरेदीसाठी संकलन केंद्रे आवश्‍यक 
- वापरलेली बाटली दुकानदार आणि विक्रेते यांना पुनर्खरेदी करणे बंधनकारक 
- एक लिटर आणि त्यापेक्षा जास्त लिटरच्या पीईटी बाटल्यांवर पुनर्खरेदी किंमत एक रुपया आणि दोन रुपये ठळकपणे छापणे बंधनकारक 
- पिशव्यांवर पुनर्खरेदीसाठी किंमत ठळकपणे छापणे बंधनकारक 

वगळण्यात येणाऱ्या बाबी 
- औषधांच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक 
- कृषी, वन व फलोत्पादनासाठी, घनकचरा हाताळण्यासाठी लागणाऱ्या रोपवाटिकांमध्ये वापरण्यात येणारी प्लॅस्टिक पिशवी 
- दूध पॅकेजिंगसाठी अन्न साठवणुकीचा दर्जा असलेल्या, परंतु 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाड नसलेल्या प्लॅस्टिक पिशव्या 

Web Title: plastic ban in Maharashtra