प्लॅस्टिक सापडल्यास दुकानाला टाळे लावू - रामदास कदम

Ramdas-Kadam
Ramdas-Kadam

मुंबई - प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजाणीसाठी राज्यातील प्रत्येक दुकानदाराकडून प्लॅस्टिक वापरणार नाही, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. त्यानंतर दुकानात प्लॅस्टिक आढळल्यास दुकानाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज दिला.

राज्यातील प्लॅस्टिक बंदीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे मंत्रालयात आले होते. या बैठकीनंतर कदम यांनी राज्यात प्लॅस्टिक बंदी प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. "प्लॅस्टिक बंदीबाबत आतापर्यंत सर्वांना पुरेसा अवधी दिला आहे. महाराष्ट्रात 23 जूनपासून प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली. आता दुकानदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहे. त्यानंतर प्लॅस्टिक सापडल्यास दुकाला कायमचे टाळे ठोकण्यात येतील,' असा इशारा कदम यांनी या वेळी दिला. पहिल्या वेळेस प्लॅस्टिक सापडल्यास पाच हजार दंड आकारला जात होता. दुसऱ्या वेळेस दहा हजार; तर तिसऱ्या वेळेस 25 हजार रुपये दंड आणि कारावासाची शिक्षा देण्यात येणार असल्याचेही या वेळी कदम यांनी ठणकावून सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com