प्लॅस्टिकच्या पुनर्वापरात पर्यावरणाचे नियम धाब्यावर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

मुंबई - दिल्लीतील प्रदूषित हवामानाने जनजीवन विस्कळित झालेले असताना सरसकट डावलले जाणारे पर्यावरणाचे नियम मुंबईलाही दिल्ली करून सोडतील, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली. दिल्लीतील घसरते तापमान, प्रदूषकांचे वाढते घटक ही कारणे मुंबईच्या प्रदूषणवाढीलाही कारणीभूत ठरतात. त्यामुळे पर्यावरणनियमांत प्लॅस्टिकच्या पुनर्वापरात नियम अंमलात आणले जावे अन्यथा दिल्लीसारखी अधूनमधून परिस्थिती मुंबईतही उद्‌भवेल, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञ डॉ. ऋषी अगरवाल यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

प्लॅस्टिकचा वापर हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे. परंतु, प्लॅस्टिक सरसकट कुठेही फेकले जातात. कचरा विघटन प्रक्रियेत प्लॅस्टिक वेगळे होत नाही. परिणामी देवनार डम्पिंग ग्राउंडमधील आगीचे धुरांडे दक्षिण मुंबईपर्यंत पसरले होते, ही घटना काही महिन्यांच्या अवधीनंतर पुन्हा होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. धारावी, देवनार, घाटकोपर, मानखुर्द परिसरात दिल्लीसारखी परिस्थिती होण्याचा धोका आहे. हिवाळ्यात तापमानातील घट आणि वाढत्या प्रदूषणात ही समस्या वारंवार दिसून येईल, असेही डॉ. अगरवाल म्हणाले. 

Web Title: Plastic recycling on the roof of the environmental law