#plasticBan प्लॅस्टिकबंदीला खिंडार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई - गणेशोत्सवात थर्माकोल सजावटीला परवानगी देऊन प्लॅस्टिकबंदीला पहिल्याच दिवशी खो घालणारे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी किरकोळ व्यापाऱ्यांना पॅकिंगसाठी प्लॅस्टिक पिशव्या वापरण्याची परवानगी देऊन बंदीला खिंडारच पाडले. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची व्यापाऱ्यांनी भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे केवळ सामान्य ग्राहकांपुरतीच "पाव किलो'पर्यंत प्लॅस्टिकबंदी उरली आहे. लवकरच नवे परिपत्रक काढण्यात येईल, असेही कदम यांनी जाहीर केले. 

प्लॅस्टिकबंदी विरोधात मुख्यमंत्र्यांवर दबाव येण्याची शक्‍यता आहे; पण त्यांच्या पत्नीचा बंदीला पाठिंबा असल्याने माझ्यावर कोणाचाही दबाव येणार नाही, असे वक्तव्य कदम यांनी केले होते; मात्र चारच दिवसांत कदम यांना व्यापाऱ्यांच्या दबावापुढे झुकावे लागले. किराणा दुकानदारांच्या शिष्टमंडळाने आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याच उपस्थितीत व्यापाऱ्यांची मंत्रालयात बैठक झाली. त्या वेळी प्लॅस्टिकबंदीचा नवा निर्णय घेण्यात आला. किरकोळ व्यापाऱ्यांना पाव किलोहून अधिक मालाच्या पॅकिंगसाठी प्लॅस्टिक पिशव्या वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

पाव किलोवरील किराणा मालाच्या पॅकिंगसाठी प्लॅस्टिकबंदी मागे घेण्यात आली आहे; मात्र हे प्लॅस्टिक परत घेण्याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची असेल. मुख्यमंत्र्यांनीही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. 
- रामदास कदम, पर्यावरण मंत्री 

आता यावर बंदी 
- प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग, थर्माकोल आणि प्लास्टिकच्या एकवेळ वापरता येणाऱ्या वस्तू 

नवे बदल 
- पाव किलोवरील किरणामालासाठी प्लास्टिक पिशव्या वापरता येणार 
- किरकोळ दुकानदार आणि उत्पादकांनी प्लास्टिक पॅकेजिंगच्या विल्हेवाटीची यंत्रणा उभारावी 
- पॅकेजिंगवर उत्पादकाचे नाव, पत्ता, प्लास्टिकचा दर्जा छापावा 
- उत्पादकांनी रिसायकल प्लांट आणि कलेक्‍शन सेंटर उभारावेत 

Web Title: #plasticBan Environment Minister Ramdas Kadam on Wednesday allowed retailers to use plastic bags for packing