नवनीत कौर राणा यांची खासदारकी धोक्यात?

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 जुलै 2019

नवनीत कौर राणा यांच्या खासदरकीला आव्हान
उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल 

अमरावती- नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत कौर राणा विजयी झाल्या होत्या. त्यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी स्वतंत्ररित्या दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. अपात्र “लुभाणा” जातीच्या असलेल्या नवनीत कौर यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला आणि त्या विजयी झाल्या असं याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

नवनीत कौर राणा यांनी असे करून मागासवर्गींचा संवैधानिक अधिकार  हिरावून घेतला असल्याचा आरोप याचिकांमध्ये करण्यात आला आहे, त्यामुळे नवनीत कौर राणा यांची निवड रद्द ठरवावी अशी मागणी माजी खासदार अडसूळ यांनी याचिकांद्वारे केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plea registered against navneet kaur Rana in Mumbai High court