नीलम गोऱ्हे धमकीप्रकरणी अहवाल सादर करा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

मुंबई - विधान परिषदेच्या शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह अन्य महिला आमदारांना एसएमएसवरून धमकी देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून, असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यावा. याप्रकरणी राज्य सरकारने या संदर्भातील अहवाल सभागृहात सादर करावा, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी विधान परिषदेत दिले. 

आमदार डॉ. गोऱ्हे यांना "एसएमएस'वरून एका व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाचे आज विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाच्या महिला सदस्याला अशा पद्धतीने धमकीचे "एसएमएस' येतात, ही गंभीर बाब असल्याचे मत त्यांनी मांडले. याप्रकरणी गृहखात्याने काय कारवाई केली याची माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्या शिवसेनेच्या प्रवक्‍त्या असून, या पद्धतीने धमक्‍या येत असतील तर कोणालाही वृत्तवाहिन्यांवर जाऊन मत मांडताना भीती वाटेल. त्यामुळे धमकी देणाऱ्या व्यक्तीला शिक्षा द्यावी आणि डॉ. गोऱ्हे यांना संरक्षण द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली. जयंत पाटील यांच्या या मुद्द्याला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पाठिंबा दिला. एका महिला आमदाराच्या बाबतीत ही स्थिती असेल, तर सामान्य महिलांचे काय, असा सवालही मुंडे यांनी केला.

Web Title: Please submit a report in case of a threat neelam gorhe